सोमवार, ३० जुलै, २००७

कसे सरतील सये....

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे,
सरताना आणि सांग सलतील ना...
गुलाबाची फुले दोन, रोज राती डोळ्यावर..
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना. .. भरतील ना...

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा..
रिते रिते मन तुझे उरे..
पोटभर हसे हसे , उरातुन वेडे पिसे ..
फुल..फुल कुनात झुरे...
आता जरा अळीमेळी, तुझी माझी व्यथा निरी..
सोसताना सुखावुन हसशील ना....


कोण तुझ्या शोधातुन , उभे असे सामसुम..
चिडिचुप सुनसान दिवा..
आता सांग ढळेलच अणि पुन्हा छळेलच..
नभातुन गोरा चांदवा..
चांदन्याचे कोटी कण, आठवांचे ओले सण...
रोज रोज निजभर भरतील ना...

येथे दूर देशी , माझ्या सुन्या खिडकिच्या पाशी..
झडे सर काचभर तडा...
तुच तुच, तुझ्या तुझ्या, तुझी तुझी, तुझे तुझे..
सारा सारा तुझा तुझा सडा....
पडे माझ्या वाटेतुन आणि मग काट्यातुन जातानाही पायभर मखमल ना...


आता नाही बोलायचे, जरा जरा जगायचे..
माळुनिया अबोलीची फुले...
देहभर हलुदेत, विजेवर झुलुदेत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले..
जरा घन झुरु दे ना, वारा गुदमुरु दे ना, तेव्हा नभ धरा सारी भिजवेल ना......

गुलाबाची फुले दोन , रोज राती डोळ्यावर ...
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना.. भरतील ना..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: