रविवार, २२ एप्रिल, २०१२

अवेळीच केव्हां दाटला अंधार..



अवेळीच केव्हां दाटला अंधार..
तिच्या गळा जड झाले काळेसर..

एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले..
हासताना नभ कळुन  गेलेले.....


पुन्हा मी पाहिले तिला अंगभर..
तिच्या काचोळीला चांदन्याचा जर..
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार....


कितिक दिसानी पुन्हा ती भेटली..
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली....

तिच्या डोळीयात जरा मी पाहिले..
काजळात चंद्र  बुडुन गेलेले....


  - सुधीर फडकेंच्या अल्बम मधील त्यांच्याच आवाजात नटलेले ना. धों. मनोहर यांचे हे भावगीत

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

परत सुरुवात...

एकदाचा मुहुर्त सापडला.. अहो लग्नाचा वगैरे नाही हो, तब्बल ५ वर्षानंतर परत ब्लॉग लिहिण्याचा!!

तर सांगायचेच म्हटले तर ह्या ५ वर्षात बरेच पाणी पुलाखालुन वाहुन गेले आहे.. आता हा पुल कोणता? पाणी पुलाखालुनच का वाहुन गेले? ते पाणीच होते का? असं कसं पाणी पुलाखालुन जाउ दिला? पाणी काय फुक्कट मिळते का? असं काहीतरी विचारत बसु नका..काय?

आता ठरवलं तर आहेच.. जितके काय ते पाणी वाहुन गेले आहे त्याचा हिशोब इथुन पुढच्या ब्लॉगपोस्ट्स मध्ये मांडायचा!

चला सुरुवात तर झालीच आहे, आता 'आलिये भोगासी असावे सादर' म्हणुन इथुन पुढे  निमुटपणाने वाचत रहावे :) म्हणजे अगदी काही गप्पच राहु नका..अधुन मधुन कॉमेंट्सच्या स्वरुपात पुश्पगुछ: आणि शिव्यांच्या लाखोल्या देखिल वाहू शकता.. :)

चला भेटू परत!