अवेळीच केव्हां दाटला अंधार..
तिच्या गळा जड झाले काळेसर..
तिच्या गळा जड झाले काळेसर..
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले..
हासताना नभ कळुन गेलेले.....
पुन्हा मी पाहिले तिला अंगभर..
तिच्या काचोळीला चांदन्याचा जर..
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार....
कितिक दिसानी पुन्हा ती भेटली..
तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली....
तिच्या डोळीयात जरा मी पाहिले..
काजळात चंद्र बुडुन गेलेले....
- सुधीर फडकेंच्या अल्बम मधील त्यांच्याच आवाजात नटलेले ना. धों. मनोहर यांचे हे भावगीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा