मंगळवार, ११ सप्टेंबर, २००७

पराक्रम

कपडे धुणे.....


जगातील सगळ्यात कंटाळवाणे काम! आता हा विचार करु नका की , हा नेमका कपडे धुवायच्या कामाला आहे की काय(?)। एखाद्या बॅचलर मुलग्याला पकडा आणि विचारा... समजेल. मीन्स, अगदी अलंकारीक शब्द (च्या....,इ..., उ... वगैरे) वापरुन समजुन सांगेल की कपडे धुणे(अर्थात स्वत:चे कपडे बरं का! लग्न झालेल्यांचे काही वेगळे अनुभव असु शकतील(?) ) म्हणजे काय असतं ते. कांही बॅचलरना आवडत देखील असेल(!)


रोज संध्याकाळी रुमवर परतल्यानंतर पहिला प्रश्न मनात येतो, उद्या कोणता ड्रेस ?? सगळेच कपडे मळलेत? मग! कंटाळा तर आलाय॥ आता धुवायचे का कपडे... नको... झोप पण येतेय... नकोच.. मग त्यातल्या त्यात कमी(?) मळका ड्रेस उद्यासाठी निवडायचा ...(सुटकेचा निश्वास टाकायचा... हु.. जीवावर येतेय हो कपडे धुणे!!!) , आणि झोपी जायचे , सकाळी उठल्यानंतर एक तरी ड्रेस भिजवत ठेवायचा दृढ(?) निश्चय करुन!


रात्री स्वप्नात (?) नको सांगायलाच नको... सगळा कपडांचा ढीग आणि मी एकटाच बिचारा त्यांच्याशी कब्बड्डी (की कुस्ती!) खेळतोय। अर्थात हा स्वप्नाचा भाग आहे. पण निश्चितच मनाची तयारी तरी होते. उद्या चक्क एक ड्रेस धुणार आहे गिरीश!


सकाळी महत्प्रयासाने एका ड्रेसला एरीयल मध्ये भिजायला घातले जाते। बिचारा दिवसभर मनसोक्तपणे डुंबुन घेतो सुगंधी(?) पाण्यात... आता आजचा दिवस की परत रात्र तिथेच घालवायची आहे ते त्याला माहीत नसते.


मग ऑफिस मध्ये आल्यानंतर मधुन मधुन मला रुमवर जाउन कपडे धुवायची आहेत हे आठवुन अगदी एखाद्या नवख्या नवरीला जशी घरची आठवण यावी तसे भरुन भरुन (भरभरुन म्हटलं तरी चालेल) येते.
कॉफी वगैरे घ्यायला गेल्यानंतर कपडे धुणे म्हणजे कीती कंटाळा असतो त्याची खमंग(?) चर्चा केली जाते। मनाची तयारी करतो हो॥ संध्याकाळी चक्क एक ड्रेस धुवायचाय ना गिरीशला!.



जशी संध्याकाळ होउ लागते, परत परत आठवु लागते ... कपडे धुवायचेत!! एकदम अस्वस्थ वाटु लागते... नकोच... आज ड्रेस धुवु की नको॥ की नवा शर्टच घेउ(!) ... जाउदे .. रुमवर गेल्यानंतर बघु।


एरवी रुमवर जायला उत्सुक असणारा गिरीश आज हिरमुसलेला असतो. हा हा... बिच्चारा!!
सकाळपासुन माझी अगदी मन लावुन वाट पाहणारा (की लावणारा) माझा ड्रेस देखील अगदी करुणापुर्वक नजर माझ्यावर टाकतो... मनातल्या मनात म्हणत असेल... "धुतय वाटतं आज!" हा हा..



अगदी निश्चयाने तो ड्रेस पाण्यातुन बाहेर काढला जातो, बरीचशी मारामारी केली जाते त्याचाबरोबर॥ च्या मारी(ल इ तरास झालाय).. मग कपडे धुताना पहिल्यांदा आईची फार आठवण येते... मग छोट्या भगिनी आठवतात... इथे असत्या तर कपडे धुउन दिल्या असत्या नी (काय मुलगा आहे ना... कामापुरता आठवण काढतो!)


मग वाटते .. आयला .. माझी डार्लिंगच इथे असती तर... मस्तपैकी कपडे धुवुन , प्रेस करुन तयार ठेवली असती ..( की मलाच तिचे कपडे धुवायला लावली असती काय माहित!! अनुभवी लोक काहीतरी सांगु शकतील का??) च्या मारी(ही कोन?) .. लवकरच लग्न केले पाहिजेत हा निश्चय करुन ड्रेस पिळला जातो...
आणि मग ड्रेस वाळत टाकताना .. संतोशला (माझा मित्र ..रुममेट ) माझा दोहोंचे चार करण्याचा निर्णय सांगितला जातो.. ते बिच्चारं हसतंय... !!



त्याला काय माहित.. कित्ती कित्ती मोठा पराक्रम केलाय गिरीशने आज... चक्क एक ड्रेस धुतलाय!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: